व्यवसायव्यवसाय कल्पना

Business Idea : कमी पैशात सुरू करा हा जबरदस्त व्यवसाय; दर महिन्याला होईल 40 हजारांपर्यंत कमाई

Business Idea : कमी खर्चात जास्तीत जास्त नफा देणाऱ्या व्यवसामध्ये असा एक व्यवसाय आहे, जो चांगली कमाई करून देऊ शकतो. सेकंड हँड गाडी खरेदी करून, ती भाडेतत्वावर देऊन कमाई करता येऊ शकते.

Business Idea : कमी खर्चात जास्तीत जास्त नफा देणाऱ्या व्यवसामध्ये असा एक व्यवसाय आहे, जो चांगली कमाई करून देऊ शकतो. सेकंड हँड गाडी खरेदी करून, ती भाडेतत्वावर देऊन कमाई करता येऊ शकते.

Business Idea : लॉकडाउन काळात अनेकांच्या नोकऱ्या गेल्यानंतर अधिकतर लोक व्यवसायाकडे वळले आहेत. कमी खर्चात जास्तीत जास्त नफा देणाऱ्या व्यवसामध्ये असा एक व्यवसाय आहे, जो चांगली कमाई करून देऊ शकतो. सेकंड हँड गाडी खरेदी करून, ती भाडेतत्वावर देऊन कमाई करता येऊ शकते. जर ट्रव्हल सेक्टरमध्ये व्यवसाय सुरू करण्याचा प्लॅन करत असाल, तर हा चांगला व्यवसाय ठरू शकतो. हा व्यवसाय OLA सह सुरू करता येऊ शकतो. OLA शी जोडले जाऊन ट्रॅव्हल एंटरप्रेन्योर बनू शकता. या व्यवसायातून दर महिन्याला 40 ते 45 हजार रुपये कमाई करता येऊ शकते.

KOKANI UDYOJAK
Home PageClick Here
ग्रुप जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा  :Click Here

कंपनी यासाठी खास सुविधा देत आहे. आता एकाच ऍपद्वारे आपल्या प्रत्येक गाडीपासून होणारी कमाई आणि परफॉर्मेंन्सची माहिती घेता येणार आहे. याबाबत ओलाने आपल्या वेबसाईटवर संपूर्ण माहिती दिली आहे. अधिक माहितीसाठी https://partners.olacabs.com/attach येथे क्लिक करा.

KOKANI UDYOJAK

या 10 बिझनेस आयडिया उघडतील नशिबाचे दरवाजे, कमी खर्चात होईल मोठी कमाई.

Business Idea in Marathi.

व्यवसाय सुरू करण्यासाठी आवश्यक डॉक्युमेंट्स.

  • पॅन कार्ड, कॅन्सल चेक किंवा पासबुक, आधार कार्ड, घराचा पत्ता
  • कारसाठी – आरसी, परमिट, कार इन्शोरन्स
  • ड्रायव्हरसाठी – ड्रायव्हिंग लायसन्स, आधार कार्ड, घरचा पत्ता, व्हेरिफिकेशन

प्रत्येक कारने हाईल 30-35 हजारपर्यंत कमाई.

Business Idea : ओला आपल्यासह ड्रायव्हर पार्टनर्स बनवण्याचा प्रोग्राम खूप आधीपासून चालवत आहे. जे लोक एका कारसह ओलाशी जोडले गेले आहेत त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रत्येक खर्च वजा केल्यानंतर 30 ते 35 हजार रुपये महिन्याची कमाई होते आहे. अशात जितक्या कार असतील, त्या हिशोबाने कमाई होईल. यातून ड्रायव्हर्सला सॅलरी द्यावी लागेल.

ही आहे कमाईची प्रोसेस.

सर्वात आधी सर्व डॉक्युमेंट्स घेऊन ओलाच्या ऑफिसमध्ये जावं लागेल. तेथे संबंधित टीमला याबाबत माहिती द्यावी लागेल. ओलाची टीम कमर्शियल लायसन्ससह सर्व डॉक्युमेंट्सची मागणी करेल. व्हेरिफिकेशननंतर रजिस्ट्रेशन सुरू होईल. संपूर्ण प्रक्रियेसाठी 8 ते 10 दिवस लागू शकतात.

 ड्रायव्हरला सॅलरी गाडीचा मालक देणार, कंपनी ड्रायव्हरला सॅलरी देणार नाही. जितक्या कार्स असतील, त्या सर्व ड्रायव्हर्सची सोय कार मालकाला करावी लागेल.

  • त्यानंतर ओला एक ऍप उपलब्ध करून देईल, ज्याद्वारे कार मालक सर्व गाड्या आणि ड्रायव्हर्सचं ट्रॅकिंग करू शकेल.
  • या ऍपद्वारे प्रत्येक कारच्या बुकिंग आणि त्यातून होणाऱ्या कमाईबाबत माहिती मिळेल.
  • प्रत्येक ड्रायव्हरला संबंधित सर्व माहिती, ट्रेनिंग ओला देईल.
  • महिन्याचा संपूर्ण रेवेन्यू कार मालकाच्या खात्यात येईल.
KOKANI UDYOJAK

या 10 बिझनेस आयडिया उघडतील नशिबाचे दरवाजे, कमी खर्चात होईल मोठी कमाई.

कशी होईल कमाई.

जर एकादी बुकिंग पीक अवर्समध्ये झाल्यास, त्यावर 200 रुपयांपर्यंत बोनस मिळतो. जर दिवसभरात 12 राईड पूर्ण झाल्या, तर कंपनीकडून एक ठरलेला बोनस जो 800 ते 850 रुपये आहे, तो अतिरिक्त मिळेल. 7 राईड पूर्ण झाल्यास, Minimum 600 रुपयांपर्यंत अतिरिक्त बोनस मिळेल. एयरपोर्ट ड्रॉपवरही कंपनी बोनस देते. त्याशिवाय इतर काही बोनस आहेत, जे महिन्याच्या शेवटी बँकमध्ये जमा होतात. परंतु कंपनीकडून दिल्या जाणाऱ्या बोनसमध्ये आणि कमिशनमध्ये वेळोवेळी बदल केले जातात, त्यामुळे त्याविषयी स्वत: माहिती घेणं आवश्यक आहे.

आपण आज एक Small Business Idea बद्दल माहिती वाचली त्यात आम्ही ओला सोबत व्यवसाय करून किती पैसे कमावू शकतो किंवा व्यवसाय कसा करू शकतो याची माहिती पहिली आहे. जर कोणाला हा व्यवसाय करायचा असेल तर त्यांनी कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करावी.
तुम्हाला हि माहिती आवडल्यास तुमच्या मित्र मैत्रिणींना पाठवावी.

KOKANI UDYOJAK
Join WhatsApp Group

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker