Government schemes 2022 : केंद्र सरकार कडून मिळणार 6000 रूपये , महिलांसाठी आनंदाची बातमी. अर्ज कसा करावा जाणून घ्या.

PMMVY ही योजना पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी सुरू केली. 1 जानेवारी 2017 रोजी ही योजना सुरु करण्यात आली.
आजच्या लेखात आपण PMMVY ( PRADHAN MANTRI MATRITVA VANDANA YOJANA ) हि योजना म्हणजे नक्की काय आहे ,कोणत्या महिला या योजनेसाठी पात्र आहेत. या योजेअंतर्गत महिलांना 6000 रुपये कसे मिळतील याची संपूर्ण माहिती आहे.
गाव खेड्यातील शेतकऱ्यांची आर्थिक परस्थिती बिकट असल्या करणाने सरकार नवनवीन योजना काढत असते ज्यातून जन सामान्यांना त्यांची परस्थिती बळकट करता यावी. परंतु या योजना गाव खेड्या पर्यंत पोहचत नाहित त्यांना याची माहिती देखील नसते. आत्ता सर्व ऑनलाईन झालं आहे त्यामुळे सर्वजण या योजनेचा लाभ घेता आपल्याला दिसतात .
आवश्यक कागदपत्रे, पात्रता आणि अर्ज कसा करावा याची संपूर्ण माहिती.
या योजेअंतर्गत एखादा गरीब शेतकरी किंव्हा एखादं गरीब कुटुंब किंव्हा एखादी गरोदर स्त्री असेल तर अश्या महिलेस केंद्र सरकार कडून आखलेल्या प्रधानमंत्री मातृत्व वंदना योजेअंतर्गत ६००० रुपये अनुदान देण्यात येणार आहे.
योजनेचा हेतू
आई आणि बाळाची योग्य प्रकारे देखभाल व्हावी व त्यांना चांगलं आरोग्य लाभव. आणि म्हणूनच केंद्र सरकारकडून अश्या महिलांना ६००० रुपये मदत दिली जाणार आहे.
PMMVY या योजनेचा लाभ घेण्यासाठी …
तुम्हाला अर्ज करावा लागणार आहे.PMMVY म्हणजेच प्रधानमंत्री मातृत्व वंदना योजनेचा लाभ घेण्यासाठी संबंधित अंगणवाडी महिला किंव्हा तिथल्या कर्मचारी महिलांशी तूम्ही संपर्क साधू शकता आणि हे अर्ज संबंधित अंगणवाडी महिला किंव्हा कर्मचारी महिलांकडे द्यावी लागणार आहे.
आवश्यते कागदपत्रे
1.आई – वडील यांचे ओळख पत्र
2.बँक पास बुक झेरॉक्स प्रत
3.आधारकार्ड
4.बाळाचा जन्म दाखला
वरील सर्व कागदपत्रे अनिवार्य आहेत.
अधिक माहिती साठी केंद्रसरकारच्या अधिकृत वेबसाईट ला तूम्ही भेट देऊ शकता .
One Comment