कोकण विषयककोकणी उद्योजकशेती विषयक

Paddy Farming : कोकणात केली जाणारी भात शेती. भात नांगरणी , भात लावणी ; जाणून घ्या संपूर्ण माहिती.

Rice cultivation in Konkan. Rice plowing, rice planting; Know complete information.

Paddy Farming : कोकण विभाग म्हटल्यावर डोळ्यासमोर येतो तो समुद्र मासे आणि भातशेती. आपल्या देशातील सुमारे ७५ टक्के लोकांच्या दररोजच्या आहारात भाताचा समावेश होतो. मानवी शरीरास पोषक अशा बऱ्याच अन्नघटकांचा पुरवठा हा भातातून होत असतो. तसेच इतर पिकांच्या तुलनेत पशु-पक्ष्यांचे खाद्य व औद्योगिकदृष्ट्या देखील भाताचे अनेक उपयोग होतात. त्यामुळे भात हे बहुगुणी तृणधान्य पीक म्हणून ओळखले जाते. याशिवाय हलक्या, भारी, पाणथळ, खारवट अशा विविध प्रकारच्या जमिनीत यशस्वीपणे वाढणारे व उत्पन्न देणारे भात हे प्रमुख तृणधान्य पीक आहे.

शेत नांगरणी
शेत नांगरणी

Paddy Farming: महाराष्ट्र राज्यातील लागवड करण्यात येणाऱ्या अन्नधान्य पिकांचा विचार करता ज्वारी-बाजरीनंतर भात पिकाचा क्रमांक लागतो. असे जरी असले तरी कोकण, विदर्भाचा नागपूर विभाग तसेच कोल्हापूर, पुणे, नासिक, विभागाच्या सह्याद्री लगतच्या भागातील लोकांचे भात हे प्रमुख अन्नधान्य पीक आहे. महाराष्ट्रात भात हे पीक “साळ” आणि “धान” या नावाने देखील ओळखले जाते. हेक्टरी उत्पादकता वाढवण्यासाठी सहाय्यक ठरणाऱ्या विशेषतः सुधारित भात जातींच्या लागवडीखालील क्षेत्रात वाढ, शिफारशीनुसार सेंद्रिय व रासायनिक खतांच्या मात्रांचा संतुलित वापर, मशागतीचे व लावणीचे योग्य तंत्रज्ञान, पीक संरक्षण उपायांचा अवलंब इत्यादी बाबींवर विशेष भर दिला जात आहे. संकरीत भात निर्मिती सारख्या आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब केला जात आहे.

राज्यातील खरीप व उन्हाळी हंगामात भाताची लागवड केली जाते. 

Paddy Farming- पारंपरिक बैल जोडी नांगरणी आज सुरु असली काही प्रगत शेतकरी आधुनिक उपकरणांचा वापर करुन भात शेती लागवडही करत आहेत. राज्यातील शेतकरी भातशेती अनेक वर्षापासून करीत आहेत. तरीसुद्धा देशाच्या सरासरी उत्पादकतेशी तुलना करता राज्याची उत्पादकता अत्यंत कमी असून त्यास बरीच कारणे आहेत. सुधारित व अधिक उत्पादन देणाऱ्या भात जातींच्या लागवडीखाली असलेले कमी क्षेत्र. सेंद्रिय व रासायनिक खतांचा शिफारशीपेक्षा कमी आणि असंतीलुत वापर. कीड, रोग व तण नियंत्रण उपायांचा अल्प प्रमाणात वापर. वेळेवर व पुरेशा प्रमाणात शेतमजुरांच्या उपलब्धतेतील अडचणींमुळे रोप लावणी करताना लागणारा अधिक कालावधी.

भात लावणी
भात लावणी

Paddy Farming- राज्यातील भातशेती करणारे सुमारे ८० ते ८५ टक्के अल्प व अत्यल्पभूधारक शेतकरी आणि त्यांची विखुरलेली भातशेती त्यामुळे यांत्रिकीकरणाचा कमी प्रमाणात वापर. सुधारित भात लागवडीच्या तंत्रज्ञानाचा शेतकऱ्यापर्यंत होणारा अल्प प्रमाणातील प्रसार. अति बारीक, लांब दाण्याचा व सुवासिक भात जाती भरडण्यासाठी लागणाऱ्या सुधारित भात गिरण्यांची लागवड क्षेत्रातील अपुरी उपलब्धता. देशात भात उत्पादनातील हरीत क्रांतीची सुरुवात ही सन १९६४ मध्ये तायचुंग स्थानिक १ व १९६६ मध्ये आय. आर-८ ही भात जातींची लागवडीद्वारे झाली. त्यांनतर सन १९६७ पासून आपल्या देशातील शास्त्रज्ञांना जया, रत्ना यासारख्या अनेक बुटक्या. न लोळणाऱ्या तसेच रासायनिक खतास उत्तम प्रतिसाद देणाऱ्या, लवकर तयार होणार्या, किडींना व रोगांना कमी प्रमाणात बळी पडणाऱ्या भात जातींची निर्मिती करण्यामध्ये यश मिळाले. शेतकरीदेखील या जातींची मोठ्या प्रमाणात लागवड करू लागले. तेव्हापासून खऱ्या अर्थाने आपल्या देशातील व राज्यातील भात उत्पादनात लक्षणीय वाढ दिसू लागली आहे.

महाराष्ट्रात सन १९९१ पासून भात पिकावरील संशोधनास सुरुवात झाली. आज कोकणात प्रत्येक शेतकरी विविध नविन बीयांनी वापरुन भातशेती करत आहे.

शासकीय योजना आणि उपक्रम त्यांचा लाभ कसा घेऊ शकतो.

Paddy Farming- वरील आराखडा लक्षात घेता महाराष्ट्र शासनाने याच बाबींवर लक्ष करून आता भातशेती विकास प्रकल्पाला सुरुवात केली आहे. राष्ट्रीय कृषि विकास योजनेअंतर्गत एकात्मिक भात विकास प्रकल्प. कोकणातील ठाणे, रायगड, सिंधुदूर्ग, पालघर आणि रत्नागिरी या जिल्ह्यात प्रामुख्याने राबविण्यात येणार आला. याशिवाय राज्यातील नंदूरबार आणि नगर, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यातही राबविण्यात आला होता. कोकणात भात शेती मोठ्या प्रमाणावर होते. राज्यात एकूण 1053 हजार हेक्टर क्षेत्र भातासाठी आहे. तर 2593 हजार टन तांदूळ राज्यात उत्पादीत होतो.

Paddy Rice
Paddy farming

महाराष्ट्रात तांदळाच्या अनेक जाती आहेत, पुढीप्रमाणे…

  • आजरा
  • घनसाळ
  • आंबे मोहर
  • इंद्रायणी
  • कमोद
  • काळीसाळ
  • कोलम
  • कोळंबा
  • खडक्या
  • गरा
  • गोदवेल
  • घनसाळ
  • चिन्नोर
  • चिमणसाळ,
  • जिरगा
  • जिरवेल
  • जीर
  • झिल्ली
  • टाकळे
  • डामगा
  • डामरगा
  • डोंगर
  • जांवसाळ
  • पटणी
  • पांढरीसाळ
  • बासमती
  • भोगवती
  • मोगरा
  • मुंडगा
  • रत्नागिरी
  • राजावळ
  • राता
  • रायभोग
  • वाकसाळ
  • सोनम
  • सुवर्णा
  • सकवार
  • हरकल

आदींचा समावेश आहे. सर्वसामान्य माणसं मात्र जाड आणि बारिक या दोनच प्रकारांनी भात ओळखतात.

Paddy Farming- भाताचे अधिक उत्पादन आणि भात शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी भात शेती मद्ये विकास करणे, कोकणासाठी वरदान ठरेल यात शंका नाही. शासनाकडून पीक प्रात्याक्षिक, सुधारित वाणांचे बियाणांचे वितरण, शेती शाळेच्या माध्यमातून भात पिकांसाठी विविध प्रशिक्षण कार्यक्रमांवर विशेष भर दिला जातो तसेच काही मार्गदरशन केले जाते याचा योग्य तो उपयोग आपण भात शेती साठी करू शकतो. शेतकरी शासन योजनेअंतर्गत भातपिकाच्या यांत्रिकीकरणासाठी आधुनिक तंत्रज्ञान आणि यंत्रणांची सबसिडी घेऊन त्यात प्रगती करू शकतो.कोकणातील सर्वच जिल्ह्यातील अल्पभूधारक शेतकऱ्यांना याचा मोठा लाभ होऊ शकतो.

अलीकडे काही जिल्ह्यातील शेतकरी डीआरके आणि प्रणाली 77 या सेंद्रीय भात जातीची लागवड करीत आहेत. एका माहितीनुसार तांदूळ हे गवत वर्गीय पीक आहे. एकट्या भारतात 5 ते 6 हजार जाती आहेत.

Paddy Farming- कोकणातील ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी व सिंधुदूर्ग जिल्ह्यात भात विकास प्रकल्पामुळे उत्पादनवाढी सोबतच अल्पभूधारक शेतकऱ्यांना याचा मोठ्या प्रमाणावर फायदा होणार होतो. राष्ट्रीय कृषी विकास योजनेंतर्गत निश्चित स्वरुपाचे मार्गदर्शन केले जाते, उत्पादन वाढ आणि कृषि क्षेत्रातील गुंतवणूक वाढीसाठी प्रयत्न करणे , इत्यादी बाबत प्रशिक्षण दिले जाते त्याचा योग्य तो वापर करून घेऊन उत्पादनात वाढ करू शकता.

त्यामुळं भातशेती कोकणकरांसाठी जणू वरदान च आहे , शासकीय योजनांचा फायदा घेऊन भातशेतीत आधुनिकता आणा, आणि एक व्यवसाय म्हणून त्याची देशभरात आयात निर्यात करू शकता.

वरील Paddy Farming माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक ,कॉमेंट्स , आणि शेअर करायला विसरू नका.

हे पण वाचा :

KOKANI UDYOJAK

Goat farming business in marathi- शेळीपाळन व्यवसाय बद्दल संपूर्ण माहिती जाणून घ्या.

KOKANI UDYOJAK
Home PageClick Here
ग्रुप जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा  :Click Here

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker