
1. बिल गेट्स : ‘मला जगातील सर्वांत श्रीमंत व्यक्तींच्या यादीतून बाहेर पडायचंय’

जगातील सर्वांत श्रीमंत व्यक्तींपैकी बिल गेट्स ( Bill gates ) यांनी त्यांची अब्जावधींची संपत्ती दान करून श्रीमंत लोकांच्या ( Reach People ) यादीतून बाहेर पडणार असल्याची घोषणा केली आहे.
2. ललित मोदींच्या गौप्यस्फोट नंतर पहिल्यांदाच बोलली सुष्मिता सेन. ( Sushmita sen )

उद्योगपती ललित मोदींनी अभिनेत्री सुष्मिता सेन सोबत डेटिंग करत असल्याचं सांगत सोशल मीडियावर एकच खळबळ उडवून दिली त्या नंतर पहिल्यांदाच सुष्मिता सेंननं इंस्टाग्राम वर पोस्ट शेअर केली.
3. एकही आमदार पडणार नाही पराभूत झाला तर मी राजकारण सोडुन देईल मुख्यमंत्री

एकही आमदार पडणार नाही. त्याची जबाबदारी मी घेतली आहे. यातील एकही माणूस पराभूत झाला तर मी राजकारण सोडून निघून जाईन”, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर सभेत सांगितलं आहे.
4.कृषी विद्यापीठांचा काय फायदा? गडकरींचा सवाल

अमेरिकेत एका एकरात 30 क्विंटल सोयाबीन होतं आणि आपल्या देशात 4 क्विंटलच्या वर नाही. मग कृषी विद्यापीठांचा काय फायदा? असा सवाल केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केला आहे.
5.Mumbai Mega Block Update : रविवारी ‘या’ मार्गावर मेगाब्लॉक

मुंबई : मुंबईकरांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी आहे मध्य रेल्वेवर रविवारी (17 जुलै) ठाणे ते कल्याण स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन जलद मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे.
6.रत्नागिरी जिल्ह्यातील धरणांचा पाणीसाठा पोहोचला 60 टक्क्यांवर

यावर्षी पूर्व मोसमी पाऊस समाधानकारक झाल्यानंतर आलेल्या मोसमी पावसानेही आता संपूर्ण कोकण व्यापला आहे. त्यामुळे पावसाळ्यातील 50 दिवसातच कोकणातील धरणातील जलसाठा अन्य विभागाच्या तुलनेत अव्वल ठरला आहे.
7.Maharashtra Rain Update : 3 दिवसानंतर पुन्हा पावसाने दैना उडणार, अरबी समुद्रात तीव्र कमी दाबाच्या पट्ट्याची शक्यता

मुंबई 16 जुलै : जून महिन्यात पावसाचा जोर कमी असल्याने यंदा पाऊस पडेल की नाही अशी शक्यता व्यक्त करण्यात येत होती. परंतु जुलैच्या पहिल्या आठवड्यापासून राज्यात सर्वदूर पावसाने धुमाकूळ घालण्यास सुरूवात केली आहे.
8.रत्नागिरी : गणेशोत्सवासाठी ‘मोदी एक्स्प्रेस’धावणार

रत्नागिरीः पुढारी वृत्तसेवा: गेल्या वर्षाप्रमाणे यंदाही कोकण रेल्वे मार्गावर गणेशोत्सवात भाविकांच्या सोयीसाठी दि. 28 ऑगस्ट 2022 रोजी मध्य रेल्वेच्या दादर स्थानकावरुन मोदी एक्स्प्रेस धावणार आहे.
9. रत्नागिरी : रोहा-चिपळूण ‘मेमू’ गणपती स्पेशल धावणार 12 डब्यांची

रत्नागिरी: पुढारी वृत्तसेवा: या वेळच्या गणेशोत्सवाचे औचित्य साधून कोकण रेल्वे मार्गावर रोह्याच्या पुढे प्रथमच धावणाऱ्या मेमू ट्रेनला अतिरिक्त चार डबे जोडून चालवण्याचा निर्णय कोकण रेल्वेकडून घेण्यात आला आहे.
10.Special Railway: पर्यटकांना हेरून गुजरात ते गोवा स्पेशल रेल्वे गाड्या, विशेष गाड्यांची संपूर्ण माहिती

मुंबई गणपतीच्या काळात (Ganpanti Special) कोकणात आपल्या स्वगावी जाणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रेमात असते. कोकणात जाण्यासाठी मुंबईहून (Train for konkan) जादा गाड्या सोडण्याची गरज असताना नागपूर पुणे. पनवेल आणि रोहा-चिपळूण ( मेमू गाड्या ) सोडण्याचा प्रताप मध्य रेल्वेने केल्यानंतर आता पश्चिम रेल्वेनेही मुंबई सेंट्रल वांद्रे टर्मिनससह गुजरातच्या उधना व विडठवामित्री येथूनही गोवा ( मडगाव ) व कर्नाटकच्या ठोकूर येथे 60 गणपती स्पेशल फेऱ्या सोडल्या आहेत.
2 Comments