शासकीय योजना

अनुसूचित जाती प्रवर्गातील विदयार्थ्यांसाठी व्यवसाय प्रशिक्षण शुल्क प्रतिपुर्ती योजना. ( Vocational Training Fee Reimbursement schemes for Scheduled Caste Students)

Vocational Training Fee Reimbursement schemes for Scheduled Caste Students

आढावा

शासकीय औदयोगिक प्रशिक्षण संस्थामधील पीपीपी योजनेंतर्गत उपलब्ध जागांवर तसेच खाजगी औदयोगिक प्रशिक्षण संस्थामधून शिल्प्‍ कारागिर प्रशिक्षण योजनेंतर्गत अभ्यासक्रमांसाठी केद्रीय ऑनलाईन पध्दतीने प्रवेश घेतलेल्या अनुसूचित जाती प्रवर्गातील विदयार्थ्यांकरिता व्यवसाय प्रशिक्षण शुल्क प्रतिपुर्ती योजना .सदर योजनेचे निकष पुर्ण करीत असलेल्या विदयार्थ्यांनाच या प्रशिक्षण शुल्क्‍ प्रतिपुर्तीचा लाभ घेता येईल.

फायदा

अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा.

1. एस.एस.सी.उत्तीर्ण आणि कौटुंबिक उत्पन्न 2,50,000/- किंवा त्यापेक्षा कमी असेल तर या योजनेकरिता पात्र नाही. भारत सरकार शिष्यवृत्ती करीता अर्ज करावा.
2. एस.एस.सी.उत्तीर्ण आणि कौटुंबिक उत्पन्न 2,50,000/- आणि 8 लाख किंवा 8 लाखापेक्षा कमी असेल तर प्रशिक्षण शुल्क्‍ च्या 100% प्रतिपुर्ती.
3. एस.एस.सी.अनउत्तीर्ण आणि कौटुंबिक उत्पन्न 8 लाखापर्यंत असेल तर प्रशिक्षण शुल्क्‍ च्या 100% प्रतिपुर्ती.

पात्रता

1. शासकीय औदयोगिक प्रशिक्षण संस्थामधील पीपीपी योजनेंतर्गत उपलब्ध जागांवर तसेच खाजगी औदयोगिक प्रशिक्षण संस्थामधून शिल्प् कारागिर प्रशिक्षण योजनेंतर्गत अभ्यासक्रमांसाठी केद्रीय ऑनलाईन पध्दतीने प्रवेश घेतलेला असावा.

2. मॅनेजमेंट कोटा प्रवेशासाठी शिष्यवृत्ती नाही.

3. विदयार्थी अनुसुचित जाती प्रवर्गातीलअसावा.त्याकडे जात प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.

4. विदयार्थ्यांच्या कुटुंबाचे मागिल वर्षातील एकत्रित वार्षिक उत्पन्न् रु.8.00 लाखाच्या मर्यादेत असावे.

5. अनाथ विदयार्थ्यांना शिफारस पत्र आवश्यक आहे.

6. उमेदवाराने यापुर्वी शासकीय किंवा खाजगी औदयोगिक प्रशिक्षण संस्थेकडुन कोणताही लाभ घेतलेला नसावा.

7. राज्य/ केंद्र शासनाच्या विभागाने अथवा त्यांच्या अधिपत्याखालील स्थानिक प्राधिकरण, कंपन्या अथवा महामंडळे यांनी पुरस्कृत केलेल्या कोणत्याही प्रशिक्षण कार्यक्रमाचा यापुर्वी लाभ घेतलेला नसावा.

8. विदयार्थी महाराष्ट्राचा अधिवासी असणे आवश्यक आहे.

9. शिल्प कारागिर प्रशिक्षण योजनेअंतर्गंत महासंचालक, प्रशिक्षण नवी दिल्ली,( DGT) अथवा महाराष्ट्र राज्य व्यवसाय प्रशिक्षण परिषद( MSCVT) यांनी मान्यता दिलेल्या व्यवसाय अभ्यासक्रमांच्या तुकडयांचा प्रवेशित जागांवर प्रवेश घेणे बंधनकारक राहील.

10. उपस्थितीचे निकष अनिवार्य आहेत.

11. अर्जदार विदयार्थ्यांस प्रत्येक सत्र परिक्षा अथवा वर्षाची परिक्षा देणे आवश्यकराहील.केवळ विशिष्ट परिस्थितीत विशेषत आजारपणाच्या कारणास्तव परिक्षा देणे शक्य झाले नसल्यास तसे विदयार्थी व संबधित संस्थेने शिफारस केल्यानंतर सहसंचालक, प्रादेशिक विभाग यांनी प्रमाणीत करणे आवश्यक आहे.

12. संबधित विदयार्थी स्वतच्या चुकीच्या वर्तनामुळे समाधानकारक शैक्षणिक प्रगती करत नसल्याबाबत किंवा संबंधित प्राधिका- याच्या पुर्वपरवानगीशिवाय अनियमित असणे अथवा गैरहजर रहाणे इत्यादी स्वरुपाचे गैरवर्तन करत असल्याबाबत शैक्षणिक संस्थेच्या प्रमुखाने निदर्शनास आणले तर अशा विदयार्थ्याकरिता संस्थेला शुल्क् प्रतिपुर्ती अनुज्ञेय राहणार नाही.

अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा.

नूतनीकरण धोरण

i) विदयार्थ्यी पुढील वर्षी हजेरीपटावर असावा.
ii) डीजीटी, नवी दिल्ली यांच्या निकषानुसार हजेरी आवश्यक.

शासन निर्णया नुसार आवश्यक कागदपत्रे

आवश्यक कागदपत्रे
1.आधार कार्ड
2. रेशन कार्ड
3. मार्कशीट दहावी/ बारावी
4. नुतनीकरणासाठी मागील वर्षाची गुणपत्रिका
5. महाराष्ट्र अधिवास प्रमाणपत्र
6. सक्षम प्राधिका- याने निर्गमित केलेलो उत्पन्नाचे प्रमाणपत्र
7. जात प्रमाणपत्र

अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा.

हे पण वाचा :

भारतातील केंद्र सरकारच्या योजनांची यादी List of Union Government Schemes in India.

भारतातील केंद्र सरकारच्या योजनांची यादी List of Union Government Schemes in India.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker