व्यवसाय

vyavsay in marathi : व्यवसाय म्हणजे काय व व्यवसायाचे प्रकार कोणते ?

vyavsay in marathi : व्यवसाय म्हणजे आपण दुसऱ्यांनी तयार केलेला माल विकणे उदा. किराणा दुकान. मेडिकल, तसेच व्यवसाय हा स्वतःचा असतो मग त्यात तुमचा स्वतः चा दवाखाना,सलून , चहाची टपरी किंव्हा मग एखादा स्नॅक्स सेंटर.

व्यवसाय आपण आपल्या आवडीचा व आपल्या पद्धतीने करू शकतो नफा तोटा आपल्याला सहन करावा लागतो नियोजन आपल्या स्वतःला करून त्याची अमलबजावणी करावी लागते, स्थानिक नगरपालिका अथवा महानगर पालिका परवाना काढावा लागतो, एकमेव स्वतःचा नफा विचारात घेता येतो.

Table Of Contents hide

vyavsay in marathi | व्यवसाय म्हणजे काय संपूर्ण माहिती. 

व्यवसायाचे प्रकार

1. प्राथमिक व्यवसाय
प्राथमिक व्यवसाय उदाहरणे :-

  • शेती करणे
  • शिकार करणे
  • कुकूट पालन
  • मत्स्य पालन
  • दूध उत्पादन

2. द्वितीय व्यवसाय
द्वितीय व्यवसाय उदाहरणे :-

  • लाकडी वस्तू तयार करणे
  • खनिज धातूंना शुद्ध करणे

3. तृतीयक व्यवसाय

तृतीयक व्यवसाय उदाहरणे :-

  • दळणवळण
  • संचार
  • शिक्षण
  • आरोग्य सेवा
  • प्रशासकीय सेवा
  • वैयक्तिक सेवा

चतुर्थक व्यवसाय

चतुर्थक व्यवसाय उदाहरणे :-

  • संशोधन
  • न्याय विषयक मार्दर्शन
  • कर संबंधित मार्गदर्शन

 

नवीन व्यवसाय सुरू करायचंय मग त्या साठी कोणत्या बाबींची दक्षता घेतली पाहिजे..?

1) वेगळी कल्पना – ( Different Idea )

कोणताही व्यवसाय एका वेगळ्या कल्पनेशिवाय उभा राहूच शकत नाही. कारण बाजारात तुमच्या अगोदर बरेचशा लोकांनी व्यवसाय सुरु केलेला असतो. त्या बाजारात टिकण्यासाठी तुम्हाला एका वेगळ्या कल्पेनेची गरज असेल म्हणून कोणताही व्यवसाय सुरु करण्याच्या अगोदर एक वेगळी कल्पना घेऊन बाजारात व्यवसाय करायला उतरा जेणेकरून तुमचा व्यवसाय प्रगती पथावर लवकर पोहचेल.

 

२) भांडवल – ( Investment )

दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे त्या व्यवसायासाठी लागणारे भांडवल. भांडवल म्हणजे अर्थ, आणि अर्थ म्हणजे पैसा. व्यवसायाच्या दृष्टीकोनातून महत्वाची गोष्ट म्हणजे पैसा आहे. तुम्हाला व्यवसायासाठी लागणारे भांडवल बँकहि देऊ शकते.

तसेच भारत सरकारने त्यासाठी “प्रधानमंत्री मुद्रा योजनेचे” आयोजन केलेले आहे जेणेकरून नवीन व्यवसाय करणाऱ्या व्यक्तींना भांडवल दिल्या जाईल. या योजनेचा लाभ घेण्यासाठी आपण आपल्या बँकेला भेट द्या आणि आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करून आपल्या व्यवसायासाठी भांडवल उभे करा.

३) सकारात्मक दृष्टीकोन –

कोणत्याही गोष्टीला सकारात्मकतेने पाहणे हा सुद्धा एक गुण आहे.हा गुण प्रत्येक व्यावसायिकात असणे आवश्यक आहे. त्यामुळेच प्रत्येक परिस्थितीला सामोरे कसे जायचे हे माणसाला चांगल्या प्रकारे जमत.

व्यवसायात सकारात्मक दृष्टीकोन असणे खूप गरजेचे आहे, कारण व्यवसायात चढ-उतार होणाऱ्या परिस्थिती नेहमी येतच राहतात. त्यासाठी आपल्यामध्ये सकारात्मक दृष्टीकोन असणे गरजेचे आहे.

४) बिझनेस प्लॅन – ( Business Plan )

कोणताही व्यवसाय हा बिझनेस प्लॅन विना पूर्ण होऊच शकत नाही. बिझनेस प्लॅन व्यवसायाला एक योग्य दिशा देत असतो त्यामुळे आपला बिझनेस प्लॅन हा प्रभावी असायला हवा. हि गोष्ट लक्षात ठेवा! बिझनेस प्लॅन मुळे आपण आपल्या व्यवसायाची रूपरेषा ठरवत असतो. जेणेकरून आपल्या व्यवसायाचे पुढील पाऊल काय होऊ शकेल हे ठरवता येते. म्हणून आपला बिझनेस प्लॅन ठरवताना योग्य रीतीने ठरवावा.

५) आवश्यक कागदपत्रे – ( Documents )

व्यवसाय सुरु करतेवेळी त्या व्यवसायाला लागणाऱ्या कायदेशीर कागदपत्रांची पूर्तता करणे गरजेचे आहे. जेणेकरून भविष्यात आपल्याला कोणत्याही प्रकारच्या समस्येला सामोरे जायचे काम पडणार नाही. म्हणून व्यवसाय सुरु करण्यापूर्वी आपण हि गोष्ट जाणून घेणे आवश्यक आहे. कि आपल्या व्यवसायाच्या कागदपत्रांची पूर्तता झालेली आहे कि नाही. 

६) संयम ठेवा – ( Patient )

व्यवसायात सयंमाला खूप महत्व आहे. कोणताही यशस्वी व्यवसाय हा एका दिवसात उभा राहत नसतो. व्यवसायाचे सुरुवातीचे काही दिवस हे बाळंतपणा सारखे असतात. ज्यामध्ये व्यवसायात आपल्याला बऱ्यापैकी नफा मिळत नाही. त्यावेळेस नकारात्मक विचार न करता, संयम ठेवून आपल्या व्यवसायात आपले लक्ष लाऊन ठेवा. एक दिवस तुम्ही स्वतः पहाल कि तुमचा व्यवसाय घोड्याच्या वेगाने बाजारात प्रगती करतो आहे.

७) बिझनेस पार्टनर चांगला निवडा – ( Best Business Partner )

व्यवसाय करतेवेळी जेव्हा तुम्ही तुमच्या व्यवसायाला बिझनेस पार्टनर शोधता तेव्हा तो बिझनेस पार्टनर विश्वासू असायला हवा कारण बरेचदा असे होते कि आपण ज्या व्यक्तीवर स्वतःपेक्षा जास्त विश्वास ठेवतो तोच व्यक्ती आपल्या विश्वासाला पात्र ठरत नाही. म्हणून व्यवसायात आपला बिझनेस पार्टनर निवडताना सांभाळून निवडा.

८) प्रतिस्पर्धा जाणून घ्या – ( Competitors )

What is a Business : व्यवसाय म्हटलं म्हणजे प्रतिस्पर्धा तर येणारच! प्रतिस्पर्धा नसेल तर प्रगती होणारच नाही, हा सृष्टीचा नियमच आहे! आपण पूर्वीच्या काळापासून पाहत आहोत. कि, अश्मयुगापासून माणूस हा प्रतिस्पर्धाच करत आहे. त्यामुळेच माणसाची एवढी प्रगती होऊ शकली आहे. तसेच व्यवसायात सुद्धा प्रतिस्पर्धा आवश्यक आहे. तुम्हाला सांगायचे एवढेच कि प्रतिस्पर्धा हि वाईट गोष्ट नाही आहे. म्हणून न घाबरता आपल्या व्यवसायाकडे लक्ष द्या! थोडे दिवस व्यवसाय तग धरेल परंतु थोडे दिवस संयमहि ठेवा काही दिवसांनी आपल्याला दिसून येईल कि आपण एका चांगल्या व्यवसायाचे मालक झालेले आहोत.

आत्ता व्यवसाय किंव्हा उद्योग म्हणाला की कोणते कागदपत्रे आवश्यक आहेत..?

vyavsay in marathi

  1. PAN कार्ड , आधार कार्ड , पासपोर्ट ,
  2. अलीकडील पासपोर्ट फोटोग्राफ
  3. मोबाईल नंबर , ई-मेल आयडी
  4. धंद्याच्या जागेचा पुरावा – भाडेकरारनामा , lease अग्रीमेंट , तेथील अलीकडील वीजबिल , घरपट्टी , पाणीपट्टी इत्यादी
  5. शॉप ऍक्ट लायसेन्स
  6. GST रेजिस्ट्रेशन सर्टिफिकेट
  7. पार्टनरशिप असल्यास – पार्टनरशिप डीड
  8. कंपनी असल्यास – MOA – AOA आणि कंपनी incorporation ची कागदपत्रे , सर्टिफिकेट ऑफ कंमेन्समेंट
  9. व्यवसायाच्या प्रकारानुसार – ड्रग लायसेन्स , FDA licesne इत्यादी .
  10. जर तुम्ही आयात – निर्यात चा धंदा करणार असाल तर IEC चे सर्टिफिकेट
  11. डॉक्टर किंवा फार्मासिस्ट असाल तर – हॉस्पिटल किंवा मेडिकल साठी – डिग्री सर्टिफिकेट , विशेष परवानगी इत्यादी

तुम्ही तुमचा स्वतःचा व्यवसाय कसा सुरू करू शकता?  एक हजार ते पंचवीस हजार पर्यंत भांडवल असणारे व्यवसाय कोणते आहेत?

१ 】 चहा काॅफी करुन विकणे. पाचपट नफा.

२】  कुल्फी विकणे. घरीच केली तर तिप्पट नफा.

३ 】 मासे विकणे. दिडपट नफा.

४ 】 आंबे होलसेल आणून रिटेल विकणे.

५ 】 तरकारी अर्थात पहाटे होलसेल भाजी खरेदी करून रिटेल विकणे दिडपट होतात

६ 】 पाणीपुरी रगडा पुरी विकणे यात पैसे तिप्पट होतात

७】  कच्छी दाबेली. हातगाडी भाड्याने घ्या व चौपट नफा मिळवा. दाबेलीचे वेगळे पाव मिळतात.

८ 】 वडापावची गाडी लावा. स्वस्त विकलेत तरी दिडपट नफा.

९ 】 मूग भजी ची विक्री करा. घराबाहेरच स्टाॅल लावा. नंबर वन धंदा होतो. तिप्पट नफा.

१०】  ढोकळा विक्री. घरी ढोकळा बनवा. चटणी बनवा. मोठ्या स्टीलच्या डब्यात भरुन घराबाहेर किंवा मोक्याच्या ठिकाणी विका.

११ 】 चाळीस रुपये किलोच्या डोश्याच्या पीठाचे वीस डोसा तयार होतात. एक डोसा वीस रुपयांना विका. सोबत भाजक्या डाळीची चटणी व बटाटा भाजी द्या. याच पीठाचे वडेसुध्दा विकता येतात.

१२】  घरीच पोळी भाजी बनवुन कस्टमरला ऑफिस पोच डबा पोहोचवा.

१३】  फळ विक्री करा.

१४ 】 शहाळे आणून विका. रोज तेच ते ग्राहक मिळेल. बावीस रुपयांचे चाळीस रुपये होतात.

१५ 】 कापडाचे तुकडे पोत्याने विकत मिळतात. घरी शिलाई मशीन असेल व कोणाले शिलाई करता येत असेल तर झबले टोपडे व दुपटे करून विका. टाकाऊतुन टिकाऊ बनवा.

१६】  फ्लेक्स बोर्ड तयार करुन, आणून, चिटकवून, लावून द्या. दोनशे ते पाचशे रुपये प्रती मिळतात.

१७】 सातारा येथे राजवाड्याजवळ सुट्ट्या उदबत्त्या वजनावर विकतात तशा आपल्या स्वतःच्या गावातही विकता येईल.

१८】 मुंबई येथे होलसेल मार्केट मध्ये कपड्यांचा लाॅट विकत आणून घरी सुध्दा बिझिनेस सुरु करु शकता. दादर रेल्वे स्टेशन शेजारीच होलसेल मार्केट आहे.

१९】  मंदिराजवळ नारळ विक्री करा

२०】  फुलांच्या मार्केटमधुन फुलं आणा व त्याचे हार करुन विका. यात खुप फायदा आहे.

२१】  हाॅटेलला कडधान्ये पुरवणे.

२२】  हाॅटेलला बटाटे खुप लागतात. सप्लाय करा.

२३ 】  घरी चटणीचे चार पाच प्रकार तयार करुन थेट फूड मार्ट ला विका किंवा स्वतः रिटेल करा.

२४】  लेदर शिलाईची जुनी मशीन घ्या व सिटकव्हर तयार करुन विका. चांगले मार्जिन मिळते.

२५】 मार्केटला लसणाच्या पाकळ्या होलसेलमध्ये मिळतात. घरी आणून गरम पाण्यात मीठ टाकून लसणाच्या पाकळ्या टाकल्या की लगेच हाताने चोळुनही साले निघतात. हाॅटेल, भाजीवाले यांना छोटी मोठी पाकिटे करुन विका.

२६】  एलईडी बल्ब स्टाॅल लावून विका. आपल्या ग्रुपवर त्याचे होलसेलर आहेत

२७】  ज्यांना योगासने येतात त्यांनी त्याचे क्लास सुरु करावेत.

२८】  महिलांसाठी घरगुती बिझिनेस, पाळणाघर सर्वात बेस्ट बिझिनेस करु शकता. भांडवल लागतेच. खेळणी, दूध, इ. ठेवावे लागते

२९】  प्लॅस्टीक बंदी होणार असल्यामुळे कागदी व कापडी पिशव्यांची मागणी वाढत आहे. घरी तयार करा. दुकानदारांना थेट विका. खुप स्कोप आहे.

३०】  पेस्टकंट्रोल कसे करतात शिकून घ्या. हा धंदा उन्हाळ्यात खुप चालतो. रुमनुसार रेट असतात.

३१】  प्लंबिंग काम शिकून घ्या. दररोज हजार रुपये ‘सहज कमवा’.

३२】 विको दंतमंजनच्या मागे लिहिलेले साहित्य काष्टौषधीच्या दुकानातुन आणून त्याचे घरी दंतमंजन तयार करा. खुप परवडते.

३३】  काही औषधी जंगलात जाऊन गोळा करुन आणून आयुर्वेद डाॅक्टरांना विका.

३४】  गोमुत्र गोळा करुन बाटलीत पॅक करुन विका.

३५】  खेडेगावात असाल तर दुध गोळा करुन शहरात जाऊन विका. देशी गायीचे दूध शहरात सत्तर रुपये ते दोनशे रुपये प्रतिलीटर विकले जाते.

३६】  गावाकडे उन्हाळ्यात कडबा कुट्टी खुप चालते. ज्याच्याकडे यंत्र आहे त्याच्याकडे जाऊन पोती भरुन घरपोच करता येतील.

३७】  फाईल तयार करायचा पुष्ठा मिळतो. पट्ट्याही मिळतात. फक्त कटिंग मशीनने कटींग करुन ऑफिसला सप्लाय करु शकता. प्रिंटिंग करुन पाहिजे असल्यास प्रेसमधून करुन घेऊ शकता.

३८】  स्टेपलर, त्याच्या पिना, पंच मशीन ऑफिसला सप्लाय करुन वीस ते पंचवीस टक्के फायदा मिळतोच. फक्त तुम्हाला बरेच ऑफिस शोधावे लागतील.

३९】  आता लगीनसराई सुरु झाली आहे. नवरदेवाचे फेटे विका. ज्यांचे टेलरींगचे दुकान आहे त्यांना हा जोडधंदा म्हणून चांगला आहे

४०】  भगव्या फेट्यांची फॅशन जोरात चालू आहे. फेटा बांधायला शिका. चार महीने भरपूर कमवा. सोबत भगव्या फेट्याचे कापडही भाड्याने द्या.

४१】  उन्हाळ्यात चिंच फोडून चिंच वेगळी करुन विकू शकता. शिरे व टरफले यांची पुड बनवुन त्यात मीठ मिसळुन तांबे पितळेची भांडी घासायला पावडर तयार करु शकता. चिंचोक्याचे भट्टीतुन लाह्याही बनवतात.

४२】 उन्हाळ्यात होलसेल दही आणून त्याचे घुसळुन लोणी व ताक काढले जाते. मसाला ताक करुन विकणे हा खुप फायदेशीर बिझिनेस आहे. फक्त त्यात बर्फ टाकू नये. त्याऐवजी माठात साठवून ठेवता येते. तसे विका

४३】 देवदेवतांचे साचे विकत मिळतात. त्यात POP टाकून मुर्ती बनवता येतील व रंगवून विकता येतील परंतु याला प्रशिक्षणाची व कौशल्याची खुप गरज आहे. कलेतुन पैसे जास्त मिळतात.

४४】 रद्दी खरेदी करणे गठ्ठे बांधून होलसेल विकणे हा सर्वात कमी भांडवलाचा सुंदर व्यवसाय आहे. अनुभवातुन हा व्यवसाय मोठा करता येईल

४५】 जिमचा अनुभव असेल तर शहरामध्ये जाम कोच म्हणून सेलिब्रेटीजना गाईडंस करुन भरपूर फी मिळते.

४६】 शेवचिवडा होलसेल आणायचा. चुरमुरे पोत्याने आणायचे. चुरमुरे चाळण मारुन साफ करून घ्यायचे. चिंचपाणी घरीच तयार करुन ओली व सुकी भेळ विकता येईल. अगदी हातगाडीसुध्दा चालेल. नाट्यगृह, समुद्र बीच, गजबजलेल्या रस्त्यावर किंवा बागेबाहेर अशी छोटी दुकाने थाटली जातात.

४७】 धोबी अर्थात लाँड्रीवाले कामगार ठेवतात. धुवायचे कपडे, ड्रायक्लिन कपडे बाहेरच्या माणसाकडुन घेतले जाते. हल्ली हा बिझिनेस कोणीही करत आहे. शहरात जाऊन टाकला तर मी खात्रीने सांगतो तुम्ही हा बिझिनेसमध्ये यशच मिळवणार. कारण शहरात महिला नोकरीचे प्रमाण खुप आहे.

४८】रेडियम चा बिझनेसही खुप चांगला आहे पण मशीनरी आवश्यक आहे. सध्या सर्वात जास्त चालणारा बिझिनेस आहे. नंबर प्लेट ते गाडीचे डेकोरेशन सर्वात रेडियम वापरतात. रोल होलसेल मिळतात. अगदी घरीही ब्लेडने कटिंग करुन विकता येते.

४९】 रिचार्ज चा बिझनेसही खुप चांगला आहे. एक हजारपासून सुरु करता येतो. विशिष्ठ टारगेट पुर्ण केले तर स्कीमनुसार अनेक जादाचे फायदेही मिळतात.

५०】  सर्वात सुंदर व लेटेस्ट बिझिनेस म्हणजे मोबाईल ऍक्सेसरी विकणे.

वरील माहिती सांगितल्या प्रमाणे आपण प्रत्येक व्यवसायाची माहिती आपल्या पुढील येणाऱ्या ब्लॉग मद्ये सखोल आणि सविस्तर सांगणार अहोत.

 

 

 Content Credit : Ms. Ashvini Dhulap ( Founder )

उद्योग म्हणजे काय हे जाणून घेण्यासाठी या लिंक वर क्लिक करा. 

व्यवसाय रजिस्टर करण्यासाठी आणि व्यावसायिक कागदपत्रे काढण्यासाठी यावर क्लीक करा.

वरील माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक ,कॉमेंट्स , आणि शेअर करायला विसरू नका.

ध्येय व्यावसायिक घडवून… कोकणी उद्योजक असा समृद्ध आणि प्रगतिशील समुदाय निर्माण करणे.

#व्यवसाय 

 

10 Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker