स्टार्ट-अपचा विचार करताय?; फक्त १० हजारांत तुम्ही सुरू करु शकता स्वतःचा व्यवसाय!

Business Ideas In Marathi: ऑफिसमधील तेच तेच आणि कंटाळवाण्या कामाच्या पद्धतीतून बाहेर पडण्याची इच्छा असेल.. आपल्या मर्जीप्रमाणे काम करून हवा तेवढा पैसा आणि समाधान मिळविणाऱ्यांचे अनुकरण करायचे असेल, तर आता तुम्ही स्टार्ट-अपचा विचार करु शकता
Business Idea: देशात स्टार्टअपच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे. देशात नवीन उद्योगांना चालना मिळावी, यासाठी केंद्र सरकारकडून नव नवीन उपक्रम राबवत असतात. आज फूड ते एज्युकेशन सेक्टरमध्येही नवीन आयडियासह तुम्ही नवीन बिझनेस सुरु करु शकता. या बिझनेसमधून तुम्ही जबरदस्त कमाई करु शकतात.

Business Idea : कमी पैशात सुरू करा हा जबरदस्त व्यवसाय; दर महिन्याला होईल 40 हजारांपर्यंत कमाई
Business Ideas In Marathi: Stationary Business
तुम्हीही बिझनेस करण्याचा विचार करत असाल तर अवघ्या १० हजार रुपयांत तुम्ही तुमचा स्वतःचा व्यवसाय सुरू करु शकता. स्टेशनरी हा असा व्यवसाय आहे जिथे कधीच नुकसान होऊ शकत नाही. पूर्ण वर्ष स्टेशनरीच्या सामानांची प्रचंड मागणी असते.
लोकेशन सगळ्यात महत्त्वाचं
शाळा-महाविद्यालयामबाहेर असलेल्या स्टेशनरी दुकानांच्या बाहेर नेहमीच मोठी गर्दी असते. अशा वेळी तुम्हीदेखील स्टेशनरीचं दुकान थाटण्याचा विचार करत असाल तर एका चांगलं लोकेशन शोधण्याची गरज आहे. पेन, पेंन्सिल, नोटपॅडसारख्या स्टेशनरी वस्तूंची मागणी जास्त आहे. त्याचबरोबर तुम्ही स्टेशनरीच्या दुकानात लग्नाचे कार्ड, गिफ्ट कार्डसारख्या वस्तूंही ठेवू शकतात.




या 10 बिझनेस आयडिया उघडतील नशिबाचे दरवाजे, कमी खर्चात होईल मोठी कमाई.
स्टेशनरीचं दुकान टाकण्याचा विचार करत असाल तर तुमच्या दुकानाला शॉप अँड एस्टेब्लिशमेंट अॅक्टअंतर्गंत रजिस्ट्रेशन करावं लागणार आहे. दुकानासाठी ३०० ते ४०० चौरस मीटर जागेची गरज आहे. तसंच, स्टेशनरीचं दुकानासाठी तुम्हाला कमीत कमी भांडवलं लागणार आहे. सुसज्य असं दुकान सुरु करण्यासाठी तुम्हाला जास्तीत जास्त ५०-६० हजार रुपयांची गरज भासेल. मात्र, दुकान शाळा व महाविद्यालयांच्या जवळ असावे हे फक्त लक्षात असूद्या.
तुम्ही सुरुवातील १० हजार रुपयांतही या नव्या व्यवसायाची सुरुवात करु शकता. लोकल प्रोडक्ट्स सुरुवातीला दुकानात ठेवून तुम्ही कमाई दुपट्टीने वाढवू शकता. जस जसा व्यवसायात जम बसतोय असं वाटत असल्यास तुम्ही ब्रँडेड प्रॉडक्ट दुकानात ठेवू शकतात. व्यवसायाच्या सुरुवातीला फक्त पेन, पेन्सिल आणि नोटबुकची विक्री करुन तुम्ही चांगला नफा कमवू शकता.
लहान शहरातील काही शाळांसोबत तुम्ही टाय-अप करु शकता. तिथे विद्यार्थ्यांना लागणारी पुस्तकं तुम्ही उपलब्ध करुन देऊ शकता. अशा प्रकारे तुम्ही तुमचा व्यवसाय वाढवू शकता. दुकानांच मार्केटिंग हा सुद्धा एक चांगला पर्याय आहे. दुकानाच्या नावाचे पॅम्पलेट बनवून तुम्ही शहरात वाटू शकता. त्याचबरोबर शाळा, महाविद्यालयात तुम्ही तुमच्या दुकानाची जाहिरात करु शकता.
जर कोणाला हा व्यवसाय करायचा असेल तर त्यांनी कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करावी. तुम्हाला हि माहिती आवडल्यास तुमच्या मित्र मैत्रिणींना पाठवावी.



