शासकीय योजना

Annasaheb Patil Loan Apply 2023 | अण्णासाहेब पाटील कर्ज योजना संपूर्ण माहिती.

annasaheb patil business loan | annasaheb patil maratha loan | annabhau patil loan |annasaheb patil loan scheme for maratha | annasaheb patil mahamandal loan |annasaheb patil loan | annasaheb patil loan bank list

Annasaheb Patil Loan Apply : नमस्कार मित्रांनो आपण वेगवेगळ्या सरकारी योजना पहिल्या ज्यातून आपण कर्ज घेऊ शकतो तसेच आज या लेखात आपण कश्याप्रकारे आण्णासाहेब पाटील कर्ज योजना चा लाभ कसा घेऊ शकतो हे पाहणार आहोत. आण्णासाहेब पाटील कर्ज योजना काय आहे ही कर्ज योजना घेण्यासाठी कोणती पात्रता पाहिजे कोणती आवश्यक कागदपत्रे लागतात आणि ही कर्ज योजना घेण्यासाठी कश्याप्रकारे अर्ज करावा लागतो हे सर्व आपण या ब्लॉग मध्ये पाहणार आहोत. तरी सर्वांनी हा लेख संपूर्ण पहा….

सर्वप्रथम आम्ही सांगू इच्छितो कि जे नवीन व्यवसाय सुरु करण्यासाठी इच्छुक असणाऱ्या तुरुणांसाठी ही योजना अत्यंत लाभदायक आहे कारण आण्णासाहेब पाटील योजना ही बिनव्याजी कर्ज योजना आहे यावर कोणतेही व्याज आकारले जात नाही. म्हणून जास्तीत जास्त तरुणांनी तसेच नवीन व्यवसाय सुरु करू इच्छित असणाऱ्या प्रत्येकाने या कर्ज योजनेचा लाभ घ्यावा.

अण्णासाहेब पाटील कर्ज योजना काय आहे ?

Annasaheb Patil Loan Apply 2023 : ही नेमकी योजना आहे तरी काय? ही योजना नवनवीन व्यवसाय सुरु करू इच्छिणाऱ्या महाराष्ट्र राज्यातील तरुणांसाठी आहे. राज्य शासनाच्या वतीने अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास मंडळाची स्थापना ही महाराष्ट्र राज्यातील आर्थिकरित्या विकास व्हावा यासाठी केली गेली आहे.

सध्या वाढणाऱ्या बेरोजगारीचा विचार करता महाराष्ट्र राज्यातील युवकांना काम मिळावे आणि सोबतच व्यवसायाकडे वळावे या साठी या योजनेची सुरुवात करण्यात आली आहे. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे हे कर्ज बिनव्याजी असल्यामुळे हे कर्ज घेणे खूप सोयीस्कर जाते. या कर्जाचे व्याज हे व्याज महामंडळ भरते. म्हणून ही योजना युवकांना खूप उपयुक्त आणि फायदेशीर ठरते. हे कर्ज एकदम सरळ आणि सोप्या मार्गाने उपलब्ध करून देण्यात आले आहे.

अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास मंडळ या मध्ये एकूण 3 कर्ज योजना आहेत

1 वयक्तीक कर्ज व्याज परतावा योजना

2 गट कर्ज व्याज परतावा योजना

3 गट प्रकल्प कर्ज योजना

Annasaheb Patil Loan घेण्यासाठी लागणारी पात्रता :

  • अर्जदार हा रहिवाशी महाराष्ट्राचा असला पाहिजे
  • वयोमर्यादा 18 ते 45 मध्ये असली पाहिजे
  • कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न : ग्रामीण भागासाठी 40,000 च्या आत तसेचग शहरी भागासाठी 55,000 च्या आत असले पाहिजे
  • किमान 3 वर्ष तरी गाव जिल्ह्यातील वत्सव्य असावे.
  • अण्णासाहेब पाटील कर्ज योजना घेण्यासाठी लागणारी कागदपत्रे :
  • अध्याकार्ड / निवडणूक ओळखपत्र
  • रहिवासी दाखला
  • जन्म दाखला
  • शाळा सोडल्याचा दाखला
  • उत्पनाचा दाखला
  • कर्ज घेण्याचा प्रकल्प अहवाल
  • प्रतिज्ञापत्र
  • कास्ट सर्टिफिकेट
  • पासपोर्ट साईझ फोटोग्राफ
  • पॅनकार्ड
  • मोबाईल नंबर
  • ई-मेल आयडी

वरील सर्व कागदापत्रे तयार करून तुम्ही अण्णासाहेब पाटील कर्ज योजनेचा लाभ घेऊ शकता.

Annasaheb Patil Loan Apply : अर्ज कसा करावा

आता आपण पाहूया कि Annasaheb Patil Loan योजनेचा अर्ज आपण कश्याप्रकारे करू शकतो.

  1. सर्वप्रथम तुम्ही रोजगार व स्वयंरोजगार मार्गदर्शन केंद्रात नोंदणी करून घ्या कारण ही नोंदणी करणे अत्यंत आवश्यक आहे.
  2. नोंदणी केल्यानंतर तुमचे प्रोफाइल ओपन होईल त्या प्रोफाइल चा डाटा तुम्हाला दिसेल त्यात तुम्ही तुमचा प्रोफाइल फोटो सेटअप करून घ्या.
  3. आता तुम्हाला तुम्ही पात्र असलेल्या सर्व योजनाची यादी तुमच्या समोर दिसेल.
  4. जर तुम्ही तिथे योजना निवडली तर तिथेच तुम्हाला अर्ज उपलब्ध होईल.
  5. मिळालेला अर्ज तुम्ही योग्य ती आणि अचूक माहिती टाकून भरणे आवश्यक आहे.
  6. सोबत तुम्ही जमा केलेली काही कागदपत्रे तिथे सांगितल्या प्रमाणे अपलोड करणे गरजेचे आहे.
  7. अर्ज पूर्ण भरून झाल्यावर तिथे तुम्हाला एक फी भरण्याचा ऑपशन येईल या फॉर्म ची फी 50 रुपये भरून तुमचा अर्ज पूर्ण करावा.

अण्णासाहेब पाटील कर्ज योजना अटी व शर्ती

  • तुम्हाला ह्या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्ही या पूर्वी कोणत्याही महामंडळाच्या योजनेचा लाभ घेतलेला नसावा
  • अर्जदार हा 18 ते 45 वयोगटातील असणे बंधनकारक आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी पुरुष तसेच महिलाही पात्र आहेत. महिलांसाठी जास्तीत जास्त 55 वर्षे पर्यन्त या योजनेचा लाभ घेऊ शकतात त्यांच्यासाठी 55 वर्षापर्यन्त चा वयोगट आहे.
  • या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर अर्जदार हा मराठा समाजातील व्यक्ती असणे बंधनकारक आहे. आणि ज्या समाजासाठी कोणतेही महामंडळ कार्य करत नाही तेही अर्जदार या योजनेसाठी अर्ज करून लाभ घेऊ शकतात.
  • या योजनेचा लाभ घेणाऱ्या पात्र अर्जदाराचे वार्षिक उत्पन्न घे जास्तीत जास्त 8 लाखापर्यंत असावे.
  • अर्जदाराणे अर्ज केल्यानंतर 7 दिवसाच्या आत केलेल्या अर्जावर पुढील कार्यवाही करण्यात येते
  • अर्ज मिळाल्यानंतर अर्जदाराने येत्या 6 महिन्याच्या आत तुमच्या व्यवसायाचे 2 फोटो वेबसाईट वर अपलोड करणे बंधनकारक आहे.

अश्याप्रकारे तुम्ही तुमच्या नवीन व्यवसायासाठी अण्णासाहेब कर्ज योजनेचा लाभ घेऊन तुमच्या व्यवसायाची सुरुवात करू शकता.

या योजनेचा व्याज परतावा किती आहे?

Annasaheb Patil Loan: या योजनेच्या अर्जदारचा पहिला हफ्ता हा अनुदान म्ह्णून अदा केला जातो. ह्या पहिल्या हफ्त्यामध्ये व्याज तसेचग मुद्दल याचाही समावेश केला आहे. तसेच या योजनेअंतर्गत 3 लाख कर्ज योजनेपर्यंत च्या रक्कमेवर 12% व्याज आहे.

महाराष्ट्रातील युवकांनी जास्तीत जास्त या योजनेचा लाभ घ्यावा म्हणून महाराष्ट्र सरकार ने ही योजना उपलब्ध करून दिली आहे.

पत्ताअण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ
जी. टी हॉस्पिटल कंपाऊंड, बद्ड्रुद्दीन तय्यबजी मार्ग,
जे.जे.स्कूल ऑफ आर्ट्स मागे, मुंबई 400 001.
दूरध्वनी.22657662
फॅक्स क्रमांक22658017
वेब साईटhttps://udyog.mahaswayam.gov.in/#/home

निष्कर्ष :

या लेखात आपण Annasaheb Patil Loan योजना म्हणजे काय त्यासाठी कोणती कागदपत्रे तसेच कोणती पात्रता लागते आणि आपण हा अर्ज कसा करू शकतो याची संपूर्ण माहिती पहिली आहे

ही माहिती आपल्याला आवडल्यास नक्की तुमच्या मित्रा मैत्रिणींना तसेच नातेवाईकांना पाठवा कदाचित या योजनेचा लाभ कोणाला तरी तुमच्या माध्यतून घेता येईल

अशीच नविनवीन योजना तसेच व्यवसाय कल्पना यांची माहिती घेण्यासाठी आमच्या कोकणी उद्योजक या वेबसाईट ला वारंवार भेट द्या तसेच आमच्या official Whatsapp Group जॉईन करून सर्वात पहिली माहिती मिळवा.

Annasaheb Patil Loan Apply 2023
Annasaheb Patil Loan Apply 2023

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker