कोणत्या प्रकारचे उद्योग-व्यवसाय आपण कोकणात सुरू करू शकतो…? ( What kind of Business we can start in Konkan? )
कोणत्या प्रकारचे उद्योग-व्यवसाय आपण कोकणात सुरू करू शकतो…?
भारतातील कोकण हा प्रदेश भारता पश्चिम समुद्रकिनारा आणि किनाऱ्याला समांतर असलेली सह्याद्री डोंगररांग यांच्या मधल्या भागात असलेला भूमीचा पट्टा आहे. कोकण किनारपट्टी हा एक ७२० कि.मी. (४५० मैल) लांबीचा समुद्रकिनारा आहे. हा प्रदेश महाराष्ट्र,गोवा आणि कर्नाटक या तीन राज्यांच्या सीमावर्ती भागात येतो. कोकणची भूमी अपार निसर्ग सौंदर्याने नटलेली आहे. माडांच्या राया, आंबे, सुपारी, केळीच्या बागा, फणस, काजू, कोकमाची झाडे, बांबूची शेती आणि डोंगरउतारांवर केलेली भातशेती हे खूप मोठ्या प्रमणात आहे, असा निसर्गाचा वरदहस्त कोकण प्रदेशाला लाभला आहे.
त्यामुळे उद्योग व्यवसायाच्या दृष्टीने कोकण विभाग एक परिपूर्ण विभाग ठरू शकतो. तेथे शेती, झाडे लागवड , आणि अन्य प्रकारच्या उद्योग व्यवसायांना पूरक असे वातावरण, पाणी आणि सुपीक जमीन असल्या कारणाने कमी खर्चात आणि कमी भांडवल कमी जागेत आपण उद्योग सुरू करून उद्योगिक क्षेत्रात पाय रोवू शकतो आपल्या कोकणचे नाव आपण जगाच्या काना कोपऱ्यात पोहचवून शकतो.
कोकणात आपण कोणत्या प्रकारच्या कच्या मालापासून प्रॉडक्ट तयार करू शकतो?
कोकणात आपण,
आंबा काजू फणस डायरेक्ट होलसेल ने मार्केट मध्ये विकू शकतो , तसेच
आंबा, काजू ,फणस, कोकम, आणि इतर रानमेवा यांच्या पासून बाय प्रॉडक्ट बनवून ती बाजारात विकू शकतो.
तसेच कोकणाला अथांग असा समुद्र किनारा लाभला आहे त्यामुळे मासेमारी हा व्यवसाय मोठ्या प्रमाणत होऊ शकतो. त्यांची मोठ्या मोठ्या मार्केट मद्ये आयात निर्यात करू शकतो.
बांबू शेती लागवड करून ते प्रत्यक्षात बाजारात पाठवू शकतो तसेच त्याच्या पासून असंख्य बाय प्रॉडक्ट बनवून ते बाजारात विकू शकतो.
कोकणात भात शेती मोठ्या प्रमाणत होते, वेगवेगळ्या पद्धतीची आधुनिक शेती लागवड करून वेगवेगळ्या जातीच्या भाताची शेती करु शकतो. ते बाजारात विकू शकतो तसेच नाचणी, वरी इत्यादी पिके घेऊ शकतो .
त्याच प्रमाणे खैर या झाडा पासून काथ , रंग तयार करू शकतो त्याला सुद्धा बाजारात खूप मागणी आहे तसेच एरंडा या झाडापासून आपण, रंग, तयार करू शकतो, नारळ साग, आयन, आंबा इत्यादी झाडांच्या टिकावू लाकडांपासुन इतर शोभेच्या वस्तू, बनवून बाजारात प्रत्यक्षात विकू शकतो.
असंख्य औषधी वनस्पती आहेत त्यांच्या पासून आयुर्वेदिक औषधे सौंदर्य प्रसाधने बनवून मार्केट मध्ये आणू शकतो.
पाहायला गेलं तर अश्या प्रकारच्या असंख्य गोष्टींवर कोकणात उद्योग- व्यवसाय आपण सुरू करू शकतो, आपल्या कोकणाला एक उद्योगिक विभाग म्हणून ओळख करून देऊया आणि आपल्या कोकणला एक नवीन ओळख निर्माण करूया .
कोकणी उद्योजक असा समृध्द आणि प्रगतिशील समुदाय निर्माण करणे हा “कोकणी उद्योजक ” चा हेतू आहे.. तुम्हाला या वेबसाईट वर कोकणात सुरू करू शकणाऱ्या प्रत्येक उद्योग- व्यवसायाबद्दल परिपूर्ण माहिती दिली जाईल इथून पुढे येणाऱ्या प्रत्येक अपडेट साठी आमच्याशी कनेक्ट रहा आणि सहकार्य करा.
कोकणात तयार होणारे प्रॉडक्ट्स आणि त्यांची सविस्तर माहिती.
प्रॉडक्ट
१. आंबा,काजू, फणस, कोकम इत्यादी बाय प्रोडक्ट आणि त्यांची माहिती.
२. खैर, नारळ, आंबा, साग इत्यादी पासून तयार करण्यात येणाऱ्या प्रॉडक्ट ची सविस्तर माहिती.
३. औषधी वनस्पती ,आयुर्वेदिक प्रसाधने इत्यादी प्रॉडक्ट आणि त्यांचे फायदे
४. कोकणी – मालवणी मसाले
५. मासेमारी
६. शेती आणि बरेच काही
७. इतर लघु गृह उद्योग
८. बांबू लागवड आणि प्रॉडक्ट
९. कच्या मालापासून कमी खर्चात केले जाणारे उद्योग
१०. हॉटेल, रेस्टॉरंट, स्नॅक्स सेंटर
वरील सर्व प्रकारच्या प्रॉडक्ट्स आणि उद्योग -व्यवसाय बद्दल संपूर्ण माहिती आपण पुढील येणाऱ्या ब्लॉग मद्ये एक एक करून सांगणारं आहोत. अपडेट रहा आणि ब्लॉग वाचा ,आवडले तर नक्की लाईक कॉमेंट , शेअर करा.
वरील माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक ,कॉमेंट्स , आणि शेअर करायला विसरू नका.
ध्येय व्यावसायिक घडवून… कोकणी उद्योजक असा समृद्ध आणि प्रगतिशील समुदाय निर्माण करणे.
खुप छान माहिती दिली आहे . कोकणी माणसाला उद्योजक बनण्यासाठी मार्गदर्शन करणार सोशल मीडियावरील हा पहिला प्लॅटफॉर्म आहे. आपल्या सर्वांना माहीत आहे आजपर्यंत कोकणातील एकाही शेतकऱ्याने आत्महत्या केली नाही त्याच्यावर कितीही संकटे आली तरी तो खचून न जाता पुन्हा उभा राहून जोमाने कामाला लागतो . जर ही चिकाटी कोकणकरांनी उद्योग क्षेत्रात दाखवली तर नक्कीच कोकणातील लोकसुद्धा उद्योजक होतील आपल्याला खंत वाटली पाहिजे प्रत्येक ठिकाणातील लोकं उद्योजक आहेत उदाहरणार्थ गुजरात , राजस्थान मग आपल्या कोकणाने का मागे राह्यच ?
आता कोकणी उद्योजक यांच्यामार्फत आपल्या कोकणातील व्यावसायिक सुद्धा खूप मोठे उद्योजक होतील.
खूप छान माहिती आहे. त्यामुळे समजले की कोकणात उत्पन्न घेण्यासाठी खूप पर्याय आहेत 🤘🏻🤘🏻