शेअर बाजार

शेअर मार्केट म्हणजे काय | Information Of Share Market in Marathi

Information Of Share Market in Marathi

पैसे कमावण्याचे बरेच मार्ग आहेत, काही लोक नोकरी करून पैसे कमवतात, काही लोक व्यवसाय करून पैसे मिळवतात आणि काही लोक ऑनलाईन पैसे कमवतात काही जण सोशल मीडिया म्हणजेच इंस्टग्राम युट्युब वरून देखील पैसे कमवतात.

जर आपल्याकडे पैसे असतील तरच आपण आपले स्वप्न पूर्ण करू शकतो आणि पैशाशिवाय आपले स्वप्न एक स्वप्नच राहील. म्हणूनच जगातील प्रत्येकजण पैशाला अधिक महत्त्व देत आहे कारण जेव्हा आपल्याकडे पैसा आहे तेव्हाच आपल्याकडे आदर, संपत्ती, घर, नातेवाईक, मित्र, या सर्व गोष्टी असतील.

पण हे लोक आपले पैसे कोठे ना कोठे पणाला लावतात, मग अशी जागा कोणती आहे जिथून लोक स्वतःचे पैसे पणाला लावून नफा कमवत असतील? ती जागा म्हणजेच शेअर मार्केट, ज्याला स्टॉक मार्केट देखील म्हणतात

शेअर मार्केट हे एक व्यासपीठ आहे जिथे खरेदीदार आणि विक्रेते दिवसाच्या विशिष्ट तासांमध्ये सार्वजनिकरित्या सूचीबद्ध शेअर्सवर व्यापार करण्यासाठी एकत्र येतात. लोक बर्‍याचदा ‘शेअर मार्केट’ आणि ‘स्टॉक मार्केट’ या शब्दांचा परस्पर बदली वापर करतात.

तथापि, दोघांमधील महत्त्वाचा फरक हा आहे की पूर्वीचा वापर फक्त शेअर्सच्या व्यापारासाठी केला जातो, परंतु नंतरचे तुम्हाला विविध आर्थिक सिक्युरिटीज जसे की bonds, derivatives, forex etc.

नॅशनल स्टॉक एक्सचेंज (NSE) आणि बॉम्बे स्टॉक एक्सचेंज (BSE) हे भारतातील प्रमुख स्टॉक एक्सचेंज आहेत. BSE चा इंडेक्स Sensex असतो ज्यात 30 कंपन्या असतात आणि नॅशनल स्टॉक NSE चा इंडेक्स Nifty असतो ज्यात 50 कंपन्या असतात.

शेअर मार्केट मध्ये शेअर विकत घेणे म्हणजे कोणत्याही कंपनीचा भाग विकत घेणे होय. यात गुंतवणूकदार काही पैसे कंपनीला देतो त्याबदल्यात कंपनी त्याला हिस्सेदारी देते. जर कोण्या एका कंपनीचे 100 शेअर्स आहेत आणि तुम्ही त्यातील 1 शेअर विकत घेतला तर कंपनीत तुमची 1% हिस्सेदारी होऊन जाते आणि जर भविष्यात कंपनीला फायदा झाला तर कंपनीच्या शेअर्सचे भाव वाढतात, व जर त्या काळात तुम्ही शेअर विकले तर तुम्हाला ही नफा मिळतो.

सोप्या भाषेत सांगायचं झालं तर समजा तुमचा एखादा मित्र आहे ज्याचा एखादा जुना व्यवसाय आहे. त्याला आता स्वतःचा व्यवसाय वाढवण्यासाठी जास्त पैसे लागताय, मग त्याने आपल्या मित्रांना पार्टनरशिप साठी विचारले म्हणजेच त्याने IPO लाँच केला आपण असे समजू. मग तुम्ही त्याच्या व्यवसायाचा पूर्ण पाठपुरावा केला कि यात आपण पैसे टाकले तर फायदा होईल का? मित्रावर कर्ज किती आहे? मार्केट नुसार हा धंदा योग्य आहे का? वगैरे वगैरे…..मग तुम्ही त्यात पैसे इन्व्हेस्ट करण्याचे ठरवतात. तुमच्यात deal होते २० – ८० ची म्हणजेच तुम्ही त्याला म्हणतात कि मी व्यवसायात पैसे लावतो पण मी कोणतेही काम करणार नाही मला प्रॉफिट मधले २०% दे. तुमचा मित्र या गोष्टीला मान्य करतो.

यालाच शेअर खरेदी करणे म्हणतात, म्हणजे तुम्ही तुमच्या मित्राच्या व्यवसायाचे काही शेअर्स विकत घेतले आणि २०% भागीदार झालात असा त्याचा अर्थ होतो.

शेअर मार्केट च्या मदतीने सामान्य मनुष्य सुद्धा मोठ-मोठ्या कंपन्यांमध्ये हिस्सेदारी मिळवू शकतो. परंतु share market एक अशी जागा जिथे बरेच लोग पैसे कमवतात तर बरेच लोक आपले पैसे गमावून पण टाकतात. शेअर मार्केटमध्ये आर्थिक जोखीम असते, म्हणून नवीन लोकांना long term ट्रेडिंग करण्याची सल्ला  दिला जातो. जे लोक जोखीम घ्यायला तयार असतील त्यांनीच शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करायला हवी.

Nifty आणि Sensex मुळे लक्षात येते की ज्या कंपन्या टॉप 50 किंवा टॉप 30 मध्ये आहेत त्या कश्या पद्धतीने कार्य करत आहेत. जर कंपनी चांले काम करीत असेल तर त्याचा सरळ प्रभाव शेअर्स च्या किमतीवर पडतो.

आपण जितके पैसे गुंतविता त्यानुसार आपण त्या कंपनीच्या काही टक्के मालक बनता. याचा अर्थ असा की जर ती कंपनी भविष्यात नफा कमावते तर आपल्याद्वारे गुंतवलेल्या पैशाच्या दुप्पट पैसे आपल्याला मिळतील आणि जर तोटा झाला तर तुम्हाला एक पैसाही मिळणार नाही म्हणजे आपण पूर्णपणे आपले पैसे गमवाल.

समजा, एनएसई वर सूचीबद्ध एखाद्या कंपनीने एकूण १० लाख शेअर्स स्पष्ट केले आहेत. त्या कंपनीच्या ऑफरनुसार आपण त्या कंपनीचे जेवढे शेयर्स विकत घेतात तेवढे तुम्ही त्या कंपनी चे मालक असतात. आपण इच्छित असाल तेव्हा आपण आपला वाटा इतर कोणत्याही खरेदीदारास विकू शकता.

जेव्हा कंपनी शेअर्स जारी करते तेव्हा कोणत्या व्यक्ती किंवा गटाला द्यावयाच्या शेअर्सची संख्या हि त्यांच्या निर्णयावर अवलंबून असते. शेअर बाजारातून शेअर्स खरेदी / विक्री करण्यासाठी तुम्हाला ब्रोकरची मदत घ्यावी लागेल. हे दलाल त्यांच्या ग्राहकांकडून समभाग/ शेयर खरेदी व विक्रीसाठी कमिशन आकारत असतात.

Share Market मध्ये डायरेक्ट Customer to company (ग्राहक ते कंपनी) व्यवहार होत नाही. जर तुम्हाला शेअर विकत घ्यायचे असेल तर त्यासाठी सर्वात आधी एक ‘शेअर ब्रोकर’(शेअरची खरेदी विक्री करणारा दलाल) आवश्यक आहे. शेअर दलाल हा त्याचे कमिशन काढून कोणत्याही व्यक्ती किंवा कंपनीचे शेअर खरेदी-विक्रीचे काम करतो. शेअर बाजारात ब्रोकर स्टॉक एक्सचेंज चे सदस्य असतात आणि यामुळे फक्त तेच स्टॉक खरेदी-विक्री करू शकतात.

पण आताच्या ऑनलाईन जगात तुम्ही देखील घरी बसल्या आपल्या मोबाईल च्या सहाय्याने Stocks विकत घेऊ शकतात. यासाठी तुम्ही वेगवेगळ्या मोबाईल ऍप्लिकेशन्स आणि वेबसाइट्स चा वापर करू शकतात. खूप सारे मोबाईल ॲप्लिकेशन सुरुवातीला कोणताही ब्रोकरेज चार्ज न घेता. Share market मध्ये invest करण्याची सुविधा देतात. share market information in marathi मध्ये आता आपण जाणूया की कश्या पद्धतीने आपणही शेअर मार्केट मध्ये गुंतवणूक करू शकतात.

शेअर बाजारात गुंतवणूक कशी करावी | How to invest in share market Marathi

शेअर बाजारात गुंतवणूक करण्यासाठीच्या काही प्रसिद्ध वेबसाइट:

या शिवाय शेअर बाजारात गुंतवणुकीचे अनेक मोबाइल अँप देखील उपलब्ध आहेत. भारतीय बाजारात zerodha, upstocks, Groww, angel broking, 5 paisa इत्यादि प्रमुख अँप्लिकेशन आहेत.

सूचीबद्ध कंपनीच्या सर्व शेयर्स ची किंमत BSE/NSE मध्ये नोंदली गेलेली असते. सर्व सूचीबद्ध कंपन्यांच्या शेअर्सचे मूल्य त्यांच्या नफा कमवण्याच्या क्षमतेनुसार चढउतार होत असते. सर्व शेअर बाजाराचे नियंत्रण भारतीय सिक्युरिटीज एक्सचेंज बोर्ड (SEBI) च्या ताब्यात आहे.

शेयर बाजारात आपली कंपनी चे शेयर्स आणायला याच सेबी ची परवानगी घ्यावी लागते. त्यांच्या परवानगी नंतरच कोणतीही कंपनी स्वतःचे शेयर्स बाजारात उतरवू शकते.

Table Of Contents hide

शेअर मार्केटचे प्रकार

 शेअर बाजारांचे पुढील दोन भागात वर्गीकरण करता येते: प्राथमिक बाजार आणि दुय्यम बाजार

  1. प्राथमिक शेअर बाजार

जेव्हा एखादी कंपनी शेअर्सद्वारे निधी उभारण्यासाठी स्टॉक एक्स्चेंजमध्ये प्रथमच नोंदणी करते तेव्हा ती प्राथमिक बाजारात प्रवेश करते. याला इनिशियल पब्लिक ऑफरिंग (IPO) असे म्हणतात, ज्यानंतर कंपनी सार्वजनिकरित्या नोंदणीकृत होते आणि तिचे शेअर्स मार्केट पार्टिसिपंट्समध्ये ट्रेडिंग केले जाऊ शकतात.

2. दुय्यम बाजार

एकदा कंपनीच्या नवीन सिक्युरिटीजची प्राथमिक बाजारात विक्री झाली की, नंतर त्यांची दुय्यम शेअर बाजारात खरेदी-विक्री केली जाते. येथे, गुंतवणूकदारांना प्रचलित बाजारभावानुसार आपापसात शेअर्स खरेदी आणि विक्री करण्याची संधी मिळते. सामान्यत: गुंतवणूकदार हे व्यवहार ब्रोकर किंवा इतर अशा मध्यस्थामार्फत करतात जे ही प्रक्रिया सुलभ करू शकतात.

शेअर मार्केटमध्ये काय व्यवहार होतो?

स्टॉक एक्स्चेंजमध्ये चार प्रकारच्या आर्थिक साधनांचा व्यापार केला जातो. यात समाविष्ट:

1. शेअर्स ( Shares )

शेअर हा कंपनीमधील इक्विटी मालकीच्या युनिटचे प्रतिनिधित्व करतो. भागधारकांना कंपनीला लाभांशाच्या रूपात मिळणाऱ्या कोणत्याही नफ्याचा हक्क आहे. कंपनीला सामोरे जावे लागणाऱ्या कोणत्याही तोट्याचे ते वाहक आहेत.

2. बाँड ( Bonds )

दीर्घकालीन आणि फायदेशीर प्रकल्प हाती घेण्यासाठी कंपनीला मोठ्या भांडवलाची आवश्यकता असते. भांडवल उभारण्याचा एक मार्ग म्हणजे जनतेला बाँड जारी करणे. हे रोखे कंपनीने घेतलेले “कर्ज” दर्शवतात. रोखेधारक कंपनीचे कर्जदार बनतात आणि कूपनच्या स्वरूपात वेळेवर व्याज देयके प्राप्त करतात. बाँडधारकांच्या दृष्टीकोनातून, हे रोखे निश्चित उत्पन्न साधने म्हणून काम करतात, जेथे त्यांना त्यांच्या गुंतवणुकीवर तसेच विहित कालावधीच्या शेवटी त्यांची गुंतवणूक केलेली रक्कम मिळते.

3. म्युच्युअल फंड ( Mutual fund )

म्युच्युअल फंड हे व्यावसायिकरित्या व्यवस्थापित केलेले फंड आहेत जे असंख्य गुंतवणूकदारांचे पैसे एकत्र करतात आणि एकत्रित भांडवल विविध आर्थिक सिक्युरिटीजमध्ये गुंतवतात. इक्विटी, डेट किंवा हायब्रीड फंड यासारख्या विविध आर्थिक साधनांसाठी तुम्ही म्युच्युअल फंड शोधू शकता.प्रत्येक म्युच्युअल फंड योजना समभागाप्रमाणेच विशिष्ट मूल्याची युनिट्स जारी करते. जेव्हा तुम्ही अशा फंडांमध्ये गुंतवणूक करता तेव्हा तुम्ही त्या म्युच्युअल फंड योजनेत युनिटधारक बनता. जेव्हा त्या म्युच्युअल फंड योजनेचा भाग असलेली उपकरणे कालांतराने महसूल मिळवतात, तेव्हा युनिट-धारकास तो महसूल फंडाच्या निव्वळ मालमत्ता मूल्याच्या रूपात किंवा लाभांश पेआउटच्या स्वरूपात परावर्तित होतो.

शेअर बाजार ट्रेडिंग चे प्रकार – Types of trading in share market marathi

Share market information in Marathi मध्ये आता आपण शेअर बाजाराचे प्रकार कोणते आहेत या विषयीची माहीत जाणून घेऊया :

  1. इंट्रा डे ट्रेडिंग (Intraday trading in marathi)

    इंट्रा डे ट्रेडिंग मध्ये एकाच दिवसात शेअर विकत घेऊन त्याच दिवशी मार्केट बंद होईपर्यंत ते विकून दिले जातात. हा प्रकार share market च्या एक्सपर्टस लोकांसाठी असतो. जर तुम्ही नवीन असाल तर इंट्राडे ट्रेडिंग तुमच्यासाठी नाही आहे.

  2. स्कॅल्पर ट्रेडिंग (Scalper Trading)

    स्कॅलपर ट्रेडिंग हा शेअर विकत घेण्याचा असा प्रकार असतो ज्यात शेअर विकत घेतल्याच्या 5-10 मिनिटांच्या आत विकून टाकले जातात. शेअर बाजारातला हा प्रकार सर्वात जोखमीचा प्रकार असतो. या पद्धतीची ट्रेडिंग देशात एखाद्या नवीन कायदा आल्यावर किंवा आर्थिक क्षेत्रात मोठी बातमी आल्यावर केली जाते.

  3. स्विंग ट्रेडिंग (swing trading)/ शॉर्ट टर्म ट्रेडिंग(Short Term)


    स्विंग ट्रेडिंग ही थोड्या लांब वेळेसाठी केली जाते. यामध्ये शेअर विकत घेऊन त्यांची डिलिव्हरी आपल्या अकाउंट मध्ये केली जाते. यानंतर काही महिने किंवा आठवडे किंमत वाढीची प्रतीक्षा करत शेअर्स आपल्याजवळ ठेवले जातात आणि योग्य किंमत आल्यास Stocks विकून नफा मिळवला जातो. या प्रकारात जोखीम कमी असते.

  1. लाँग टर्म ट्रेडिंग (Long Term Trading)

    शेअर्स विकत घेऊन दीर्घ काळापर्यंत आपल्या जवळ ठेवण्याच्या पद्धतीला long term trading असे म्हणतात. यात गुंतवणूकदार सहा महिन्यांपासून ते दहा वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त कालावधी शेअर आपल्या जवळ ठेवतो. या कालावधीदरम्यान जर कंपनीच्या व्यवसायात वाढ झाली तर लाँग टर्म ट्रेडिंग मध्ये गुंतवणूकदाराला चांगला नफा होऊन जातो. लॉंग टर्म ट्रेडिंग मध्ये जोखीम अतिशय कमी असते. या मुळे नव्या गुंतवणूकदारांना लॉंग टर्म ट्रेडिंग मध्ये पैसे invest करण्याचा सल्ला दिला जातो.

Top Indian share market investor

  • राकेश झुंझुनवाला
  • राधाकिशन दमानी
  • रमेश दमानी
  • रामदेव अग्रवाल
  • विजय केडिया
  • नेमीश शाह
  • पोरिंजू वेलियाथ
  • डॉली खन्ना
  • आशिष कचोलिया
  • चंद्रकांत संपत

तर मित्रांनो ही होती stock market/ share market मध्ये ट्रेडिंग करण्याबद्दलची माहिती. मला आशा आहे की या लेखाला वाचल्यानंतर तुमच्या share market basics शंका दूर झाल्या असतील. या लेखात तुम्हाला Share market marathi mahiti दिली आहे. ज्या मुळे Share market basic information in marathi तुम्हाला मिळाली असेल.

जर Share market information in marathi व शेअर बाजार संबंधी तुमच्या अजुनही काही शंका असतील तर खाली कमेंट करून तुम्ही आम्हाला विचारू शकतात. धन्यवाद…

वरील माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक ,कॉमेंट्स , आणि शेअर करायला विसरू नका.

ध्येय व्यावसायिक घडवून… कोकणी उद्योजक असा समृद्ध आणि प्रगतिशील समुदाय निर्माण करणे.

अश्याप्रकारे शेअर मार्केट बद्दल संपूर्ण माहिती मिळत राहील यासाठी आमच्या वेबसाईट सोबत कनेक्ट राहा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker